
पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मुख्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रशासकीय कार्यालय
-
मंत्रालयीन शाखा
-
तांत्रिक शाखा
प्रभारी :- कार्यालय अधीक्षक
- प्रशासकीय (“ए” शाखा) :- माहिती अधिकार / वार्षिक प्रशासकीय अहवाल / बजेट, वार्षिक तपासणी / BMI / सरकार क्वार्टर / वितरण / देखभाल / दुरुस्ती / कल्याण उपक्रम / वैद्यकीय / प्रवास भत्ता / विद्युत देयके / कुटुंब कल्याण आरोग्य योजना / दूरध्वनी / मोटर परिवहन / इंधन / इ. बिल पेमेंट ऑर्डर.
- लेखा (“बी” शाखा) :- कल्याण / डे बूक (कॅश) / प्राप्तिकर / वस्तू व सेवा कर / पेन्शन / राष्ट्रीय पेन्शन योजना / भविष्य निर्वाह निधी / वैद्यकीय / हस्तांतरण प्रवास भत्ता / घरभाडे भत्ता / बक्षिसे / आकस्मित खर्च / वेतन संबंधित काम (पुणे ट्रेझरीशी संबंधित)
- आस्थापना (“ई” शाखा) :-
‣ महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण संबंधित प्रकरणांचे व्यवस्थापन करणे.
‣ पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी / कर्मचारी यांची प्राथमिक, विभागीय व निलंबन चौकशी.
‣ पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक सेवाज्येष्ठता यादी, पदोन्नती, बदली, सेवा पुस्तक.रिक्त जागा विवरण तयार करणे, देखरेख करणे आणि अद्ययावत करणे.
‣ वर्गीकरण / प्राविण्य परीक्षा यांचे वेळापत्रक करणे.भरती नियमावली / भरती प्रक्रिया पार पाडणे आणि त्याचा पाठपुरावा करणे.
- खरेदी (“डी ” शाखा) :-
‣ सरकारी ई बाजार (GeM) आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) वर ऑनलाइन सुटे भाग
‣ उपकरणे इत्यादी खरेदी करणे. मा. पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबईयांचे मान्यतेने नवीन बिनतारी उपकरणे खरेदीबाबत निविदा प्रक्रिया राबविणे.
प्रभारी :- पोलीस उप-अधीक्षक (प्रशासन)
- मुख्यालयातील सर्व प्रशासकीय तसेच तांत्रिक शाखांचे दैनंदिन कामकाज पाहणे.
- बंदोबस्त शाखा, नियोजन शाखा, परवाना शाखा, कल्याण शाखा, पोलीस निरीक्षक (गृह), स्ट्रॅटजी सपोर्ट सिस्टम (एसएसएस) शाखा यांसारख्या तांत्रिक शाखा यांचे काम चालते.
- प्रशासकीय शाखा जसे की “प्रशासकीय (“ए” शाखा) ”, “लेखा (“बी” शाखा) ”, “खरेदी (“डी ” शाखा)”, “आस्थापना (“ई” शाखा)” यांचे काम चालते.
- बंदोबस्त शाखा :- विविध प्रकारच्या अतिरिक्त उपकरणे आणि मनुष्यबळ प्रदान करणे. वायरलेस उपकरणांसाठी स्पेअर्सची मागणी आणि खरेदी करणे. सर्व वार्षिक तपासणीचे रेकॉर्ड आणि वेळापत्रक ठेवणे.
- नियोजन शाखा :- विविध पोलीस घटकांसाठी नवीन / अद्ययावत प्रस्ताव तयार करणे. तांत्रिक समितीच्या बैठका आयोजित करणे. नवीन खरेदी प्रक्रियेसाठी Pol-4 आणि मा. पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेशी संपर्क साधणे.
- पोलीस निरीक्षक गृह :- मोटर परिवहन विभाग, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण प्रकरणे, माहिती अधिकार संबंधित कामे पाहणे.
- कल्याण शाखा :- ज्ञानेश्वरी – वरिष्ठ अधिकारी रेस्ट हाऊस, संचार – वरिष्ठ अधिकारी वसतिगृह यांचे व्यवस्थापन करणे.
- स्ट्रॅटजी सपोर्ट सिस्टम (एसएसएस) शाखा :- पोलीस संघटनेच्या आवश्यकतेनुसार कम्युनिकेशन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन (डॉ. एपीजे अब्दुल कलाम इनोवेशन सेंटर) प्रयोग करणे, विकास आणि सुधारणा करणे. राज्यातील सर्व पोलीस घटकांच्या गरजेनुसार विविध तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे.
संशोधन व विकास
प्रभारी :- पोलीस उप-अधीक्षक
-
संगणक विभाग
-
विकास विभाग
-
रेडिओ कम्युनिकेशन विभाग
-
लाईन कम्युनिकेशन विभाग
-
विद्युत विभाग
-
उभारणी शाखा
-
संशोधन व विकास भांडार
संगणक विभाग
संगणक विभागातील कामे
- खालील नमूद केलेल्या उपकरणांचे प्रगत तांत्रिक तपशील तयार करणे आणि ते तांत्रिक समितीकडे मंजुरीसाठी सादर करणे.
– संगणक
– प्रिंटर
– संगणक युपीएस
– नेटवर्क स्विच - नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर (NIC) चे ई-मेल तयार करण्यासाठी कार्यवाही करणे.
- महाराष्ट्र राज्य पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागातील सायफर संगणकांची देखभाल आणि दुरुस्ती करणे.
- मुख्यालयातील संगणक, प्रिंटर यांची वेळोवेळी देखभाल करणे.
- वेगवेगळ्या बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्स (VC ) ची व्यवस्था करणे.
- मा. पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी केलेल्या निविदा प्रक्रियेनंतर वर नमूद केलेल्या सर्व उपकरणांची संपूर्ण मूल्यमापन प्रक्रिया पार पाडणे.
- ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी करणे.
संशोधन व विकास
विकास विभाग
विकास विभागातील कामे:-
1) खालील नमूद उपकरणांची प्रगत तांत्रिक तपशील मंजुरीसाठी तांत्रिक समितीकडे सादर करणे.
- व्हीएचएफ / यूएचएफ:-
– डिजिटल मोबाइल रेडियो सेट
– डिजिटल हॅंडहेल्ड ट्रान्सरिसिव्हर
-डिजिटल रिपीटर - अॅंटेना:- व्हीएचएफ / यूएचएफ / मायक्रोव्हेव
- मायक्रोव्हेव लिंक
2) मा. पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे निविदेनंतर वरील सर्व उपकरणांच्या चाचणी प्रक्रिया व संपूर्ण मूल्यमापन प्रक्रिया यांचे संचालन पार पाडणे.
रेडिओ कम्युनिकेशन विभाग
रेडिओ कम्युनिकेशन विभातील कामे :-
- दुरुस्ती:
वायरलेस सेट, वॅाकी – टॅाकी, रिपीटर इत्यादींची दुरुस्ती करणे. - निर्लेखीकरण:
बियॉन्ड इकॉनॉमिकल रिपेअर्स (BER) वायरलेस उपकरणांच्या दोषाबाबत कारवाई करणे. - तपासणी:
मायक्रोवेव्ह लिंक्स उपकरणांची तपासणी करणे.
नवीन प्राप्त झालेले वायरलेस उपकरणे यांची तपासणी करणे.
हमी कालावधीतील कंपनीकडून दुरुस्त झालेले वायरलेस उपकरणे यांची तपासणी करणे. - तांत्रिक मूल्यमापन:
संपूर्ण मूल्यमापन प्रक्रिया पार पाडणे.
मा. पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे निविदा प्रक्रियेनंतर वायरलेस सेट, वॅाकी – टॅाकी, रिपीटर आदि उपकरणांच्या क्षेत्रीय तपासणी करणे.
लाईन कम्युनिकेशन विभाग
लाईन कम्युनिकेशन विभागातील कामे :-
- खाली नमूद केलेल्या उपकरणांचे प्रगत तांत्रिक तपशील तयार करणे:
– सर्व प्रकारचे टेलिफोन एक्सचेंज
– टेलिफोन युनिट्स आयपी/डिजिटल
– वरील एक्सचेंजेससाठी सुटे
– टेलिफोन केबल्स - ताडीरान एक्सचेंजची नियतकालिक देखभाल करणे, मुख्यालयातील सर्व इंटरकॉम विस्तार, टेलिफोन लाईन, इंटरनेट संबंधित समस्यांची देखभाल करणे.
- मा. पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबईयांचे निविदा प्रक्रियेनंतर खरेदी झालेले एक्सचेंज, टेलिफोन यांची संपूर्ण मूल्यमापन प्रक्रिया पार पाडणे
विद्युत विभाग
विद्युत विभागातील कामे :-
- खालील नमूद केलेल्या उपकरणांचे प्रगत तांत्रिक तपशील तयार करणे:
– सर्व प्रकारचे चार्जर व व्हॉलटेज स्टॅबीलायझर.
– इन्व्हर्टरची व युपीएस (क्षमता – 0.5 KVA-15 KVA)
– सर्व प्रकारचे डिझेल जेनरेटर (63 KVA पर्यन्त)
– सोलर चार्जर एमपीपीटी चार्जरसह
– सर्व विद्युत उपकरणे व सहसहिती
– सर्व प्रकारच्या बॅटरी (वॅाकी-टॅाकी बॅटरी,12V लेड अॅसिड बॅटरी) - पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र राज्य यांचेद्वारे खरेदी केलेल्या वरील चार्जर, इन्व्हर्टरची देखभाल आणि दुरुस्ती करणे.
- मुख्यालयातील चार्जर, इन्व्हर्टर आणि यूपीएस यांची नियमित देखभाल करणे.
- मुख्यालयात एम्पलीफायर सिस्टमची उभारणी करणे.
- मा. पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी खरेदी केलेल्या टेलिफोन एक्सचेंजची संपूर्ण मूल्यमापन प्रक्रिया पार पाडणे.
उभारणी शाखा
उभारणी शाखेतील कामे :-
- खालील उपकरणांची देखभाल व दुरुस्ती
– डिझेल जनरेटर
– मुख्यालयातील पथ दिवे
– मुख्यालयातील एअर कंडिशनर
- विद्युत बिल व पाणी बिल यांचे व्यवस्थापन करणे.
- स्थानिक खरेदी करणे.
- पाणी पुरवठ्यासाठी असलेले मोटरची देखभाल.
संशोधन व विकास भांडार
संशोधन व विकास भांडारातील कामे :-
- भांडारतील उपकरणे व सहसाहित्य हाताळणे आणि त्यांच्या नोंदी ठेवणे.
- तपासणी अहवालांची नोंद ठेवणे आणि खरेदी केलेल्या उपकरणांचे नमुना चाचणी अहवाल तयार करणे.
मध्यवर्ती भांडार
प्रभारी :- पोलीस उप-अधीक्षक (मुख्यालय)
भांडार विभाग – 1 (एसएम १)
- खरेदी झालेल्या बिनतारी संच, वॉकी – टॉकी, रिपीटर व सह साहीत्याचे आदेशानुसार राज्यातील पोलीस घटकांना वितरण करणे.
- बंदोबस्ताकरीता बिनतारी संच, वॉकी – टॉकी, रिपीटर व सह साहीत्य राज्यातील पोलीस घटकांना आदेशाप्रमाणे अदा करणे.
- हमी कालावधीतील नादुरूस्त बिनतारी संच, वॉकी – टॉकी, रिपीटर कंपनीकडे दुरूस्तीकरीता पाठवून पाठपुरावा करणे.
- राखीव बिनतारी संच, वॉकी – टॉकी, रिपीटर इ. उपलब्ध बाबतची माहीती वरिष्ठ कार्यालयास वेळोवेळी सादर करणे.
- राज्यातील पोलीस घटकांकडून निकामी झालेले बिनतारी संच वॉकी टॉकी रिपीटर व इतर साहीत्य जमा करून घेणे.
- निकामी झालेले बिनतारी संच वॉकी टॉकी रिपीटर व इतर साहीत्याचे वर्गीकरण व लॉट करणे.
- भांडार – १ चे संग्रहलेखा अदयावत ठेवणे .
भांडार विभाग – 2 (एसएम २)
- राज्यातील पोलीस घटकांसाठी खरेदी झालेल्या बिनतारी संच, वॉकी – टॉकी रिपीटर इत्यादींचे सुटे भाग आदेशानुसार घटकांना वितरण करणे
- बंदोबस्ताकरीता डिजिटल उपकरणांसाठी सॉफ्टवेअर / केबल राज्यातील पोलीस घटकांना आदेशाप्रमाणे अदा करणे.
- निकामी(टी) सामुग्री जमा करणे.
- भांडार -2 चे संग्रहलेखा अदयावत ठेवणे
भांडार विभाग – 3 (एसएम ३)
- राज्यातील पोलीस घटकांसाठी खरेदी झालेल्या केबल / ॲन्टेना / एक्सचेंज कार्ड / टेक्नीकल मॅन्युअल इत्यादींचे आदेशानुसार घटकांना वितरण करणे .
- बंदोबस्ताकरीता ॲनालॉग उपकरणांसाठी सॉफ्टवेअर / केबल / ॲन्टेना राज्यातील पोलीस घटकांना आदेशाप्रमाणे अदा करणे.
- निकामी (T) सामुग्री व निकामी मास्ट जमा करून घेणे.
- भांडार -3 चे संग्रहलेखा अदयावत ठेवणे.
कमीटी विभाग
- पुरवठादारांकडून प्राप्त झालेले बिनतारी संच उपकरणे सह – साहीत्य व नमूना इत्यादींची पोलीस अधिकारी यांचेकडून कमीटी करणे.
- नमूना साहीत्याचे स्वीकृती अहवाल/ तपासणी अहवाल तयार करणे.
- खरेदी झालेले बिनतारी संच / उपकरणे, सहसाहित्य इत्यादीचे स्वीकृती अहवाल/ तपासणी अहवाल तयार करणे.
चाचणी कक्ष
- बंदोबस्ताकरीता राज्यातील पोलीस घटकांना अदा करण्यात येणा-या बिनतारी उपकरणांची कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून तपासणी करणे.
- मध्यवर्ती भांडार कार्यालयातील उपलब्ध उपकरणांची देखभाल करणे.
प्रशासन विभाग
- मध्यवर्ती भांडार व खरेदी शाखा आवक – जावक कार्यालयीन पत्रव्यवहाराची नोंद करणे.
- प्रशासकीय व संकीर्ण पत्रव्यवहार हाताळणे.
- आवक पत्रांची विभाग निहाय बटवडा करणे व पुर्ततेबाबत आढावा घेवून वरीष्ठांना कळविणे.
- भांडारातील इतर विभागांना गरजेनुसार मदत करणे.
व्हीसॅट व माहिती तंत्रज्ञान
प्रभारी :- पोलीस उप-अधीक्षक
V-SAT (Very small aperture terminal) section :
- महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलनेट स्थानाकांची दैनंदिनी सद्यस्थिती तपासणी (current status) करणे.
- महाराष्ट्र राज्यातील पोलनेट स्थानकांना आवश्यक तेव्हा तांत्रिक समस्या सोडविणेकामी मदत करणे व याकरिता आवश्यक असल्यास पोलीस बिनतारी समन्वय निदेशालय, गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांचेशी समन्वय साधणे.
- अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान यांचे कार्यालयातील पोलनेट स्थानकाचे दळणवळण अखंडित सुरळित ठेवणे.
- पोलनेट व सीसीटीव्ही यांचेसाठी वापरत येणारी विविध उपकरणे यांचे तांत्रिक तपशील तयार करून तांत्रिक समितीला मान्यतेसाठी सादर करणे.
सायफर शाखा
प्रभारी :- पोलीस उप-अधीक्षक
- मा. अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे हे होल्डर आहेत.
- मा. होल्डर यांचेतर्फे पोलीस उप-अधीक्षक सायफर हे माराष्ट्र राज्याचे कामकाज पाहतात.
i) मा. संचालक तथा समन्वय पोलीस वायरलेस नवी दिल्ली (गृह मंत्रालय भारत सरकार) यांचे आदेशानुसार पोलीस उप-अधीक्षक सायफर पुणे यांचेकडून कुरियर पार्टी नवी दिल्ली आयोजनाची सर्व प्रक्रिया व कार्यवाही वेळोवेळी दर ०३ महिन्याने (एक वर्षामध्ये ०४ वेळा) घेण्यात येते.
ii) मा. अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन महाराष्ट्र
– राज्य पुणे यांचे आदेशानुसार पोलीस उपअधीक्षक सायफर यांचेकडून प्रत्येक नवी दिल्ली कुरियर पार्टी नंतर
– सर्व बीजांक कक्ष महाराष्ट्र राज्य, गोवा/पणजी, दीव दमन / आंतर राज्यीय पोलीस वायरलेस दमन, आंतर
– राज्यीय पोलीस वायरलेस मुंबई यांचे कुरियर पार्टी आयोजनाची सर्व प्रक्रिया व कार्यवाही घेण्यात येते. - महाराष्ट्र राज्यामधील बीजांक कक्षातील सर्व सायफर दस्तऐवजांचे लेख जोख, हिशोब व त्यांच्या देखरेखीबाबत काळजी घेणे.
- पुणे येथे बेसिक सायफर कोर्स चालिवणे.
- मा. संचालक तथा समन्वय पोलीस वायरलेस नवी दिल्ली (गृह मंत्रालय भारत सरकार) यांचेकडून दरवर्षी त्यांच्या वार्षिक कार्यक्रमनुसार सायफर कोर्सेस नवी दिल्ली येथे घेण्यात येतात. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामधील पोलीस घटकांकडून ईच्छुक उमेदवारांची माहिती मागवून त्यांचे नामनिर्देशन देवून त्यांना सदर कोर्सेसला पाठविण्यात येते.
- i) महाराष्ट्र राज्यामधील कोणत्याही पोलीस घटकांकडून सायफर संगणक नादुरुस्त झाल्याचा अहवाल मिळाल्यास त्याची दुरूस्तीबाबतची योग्य टी कार्यवाही घेण्यात येते.
ii) महाराष्ट्र राज्यामधील सर्व बीजांक कक्षांच्या संगणकामध्ये सायफर प्रोग्राम लोड करून दिल जातो. - महाराष्ट्र राज्यामधील सर्व बीजांक कक्षांचा पोलीस निरीक्षक पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान (वाहतूक) परिक्षेत्र / घटक यांचेकडून वर्षभरात घेण्यात येणाऱ्या दर सहमाही निरीक्षण तपासणीचा अहवाल तपासणे
परवाना शाखा
प्रभारी :- पोलीस उप-अधीक्षक
- प्रक्रियेनुसार रेडिओसाठी नवीन परवान्यांसाठी अर्ज करणे.
- सत्यापित(verify) करण्यासाठी, स्पेक्ट्रम तपासणे आणि केंद्र सरकारला योग्य स्पेक्ट्रम शुल्क भरणे.
- HF/VHF/UHF बँडमध्ये आवश्यकतेनुसार नवीन वारंवरतासाठी अर्ज करणे.
- संबधित पोलीस घटकांना मंजुरी नेटवर्क निर्णय पत्रे वितरीत करणे.
- नेटवर्क निर्णय पत्रांचे नूतनीकरण करणे.
- महाराष्ट्र राज्यमधील सर्व पोलीस घटकांचे संघटना तपशीलांची तयारी करणे.
- मा. संचालक तथा समन्वय पोलीस वायरलेस नवी दिल्ली (गृह मंत्रालय भारत सरकार) व मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे मासिक / सहा मासिक / वार्षिक वाहतूक रिटर्न सादर करणे.
- केंद्रीय मंत्री / राज्यमंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि व्हीव्हीआयपी / व्हीआयपी व्यक्तींकरिता कॉल साइन तयार करणे.
संचालक कार्यालय
वाहतूक शाखा
प्रभारी :- पोलीस उप-अधीक्षक
- पोलनेट स्टेशन्स – 64 , हाय फ्रिक्वेन्सी (एचएफ) स्टेशन्स – 46आणि ट्रॅफिक एड पोस्ट्स (टॅप्स) – 64 यांच्या वाहतूक शाखेशी संबंधित वार्षिक तपासणी भेटींचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे.
- केंद्रीय मंत्री / राज्यमंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि व्हीव्हीआयपी / व्हीआयपी व्यक्तींकरिता आणि महाराष्ट्रातील VHF कंट्रोल्सवर वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या स्थापनेसाठी कॉल साइन्सची अंमलबजावणी करणे.
- महाराष्ट्र राज्य दळणवळणाच्या तयारीत सहभाग आणि माहिती तंत्रज्ञान प्राविण्य परीक्षा, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांसाठी मा. अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याद्वारे नियुक्ती झाल्यावर सदस्य/सचिव म्हणून काम पाहणे.
- सेंट्रल चेक ऑफिस(CCO), पुणे येथे निर्माण झालेल्या ट्रॅफिक केसेसचे पर्यवेक्षण केले जाते आणि संबंधित कर्तव्य पोलीस अंमलदाराकडून स्पष्टीकरणे मागवली जातात. दोषी आढळल्यास, संबंधित कर्तव्य अंमलदाराच्या शिक्षेची वरिष्ठांस शिफारस केली जाते
- अत्यंत उच्च फ्रिक्वेन्सी चॅनल (VHF) वरील सुरक्षेच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांची छाननी केली जाते आणि संबंधित कर्तव्य पोलीस अंमलदाराकडून स्पष्टीकरण मागवले जातात. दोषी आढळल्यास, संबंधित कर्तव्य अंमलदाराच्या शिक्षेची वरिष्ठांस शिक्षेची शिफारस केली जाते.
बृहन्मुंबई नियंत्रण कक्ष








